Showing posts with label गझल तर न्हवे. Show all posts
Showing posts with label गझल तर न्हवे. Show all posts

Friday, 13 January 2017

वावटळ

वावटळीनो शांत व्हा
तसाही मी आडवाच आता

या फुलांशी मैत्री नकोच केव्हा
जरा होतो मी कडवाच आता

उद्धवस्त गलितगात्र झालो
तरी पुन्हा तुडवाच आता

धुंद बरसून घ्या मेघानो
थिजलो तरी भिजवाच आता

प्राक्तनापुढे कोण जातसे
दोस्तांनो मागे वळवाच आता

भिजून कोरडेपण जे आले
त्या तिला कळवाच आता

Thursday, 12 January 2017

कडेलोट

पायरीवर पाय ठेवतानाच कडेलोटाची भीती होती
तुही ढकलून दिलंस, जवळ घ्यायची कुठं तुला छाती होती

तू म्हटलास, आग फार धग फार अंगार फार
कसल्या भिकार माणसाशी जोडली मी नाती होती

नाही हळवेपणा न दुःख कसले, रागाची मात्र गर्दी झाली
असली कसली हि तुझ्या माझ्या प्रेमाची खाती होती