Sunday, 2 July 2017

सांज

ही सांज आज गीत घेऊन आली
तुझी पावले सूर देऊन गेली

पुन्हा आठवे शब्द तो एक कानी
त्या शब्दात गाथा सांगून  झाली

कोलाहल अंतरीचा शांत होत नाही
सर पावसाची आग लावून गेली

तू कोण माझा करू कसला खुलासा
नको नाव रस्त्यास या, ठेऊ निनावी ही गल्ली

नको वाद कसले जरा शांत राहू
राहू देे सामने व्हायचे  काही निकाली

कोसळत आहे हा पाऊस कधीचा
कोरड्या मनाची कड झालीय ओली

No comments:

Post a Comment