कधी न्हवे ते मराठी चॅनल लावलं कुठलं होतं आठवत नै पण बातम्या होत्या. बातम्यांत लग्नाची वरात परतपरत दाखवत होते, आयला म्हटलं वरातीत काय एवढं म्हणून किचनमधून बाहेर डोकावलं तर एका मुलीची वरात होती. बातम्यात सांगत होते की मुलीची मुलासारखी हौस करायची म्हणून लग्नाआधी नवरदेव मिरवतात तसं मिरवत होते. मुलीची हौस म्हणून वरात ठीक आहे तिथं आक्षेप घ्यायचं कारणच न्हवतं पण मुलासारखं हा शब्द खटकला, कुणासारखं आपण का वागावं. मुलाची बरोबरी म्हणून घोड्यावर मिरवणे, तसे ड्रेस घालणे, गाड्या उडवणे, सिग्रेटी फुकणे, दारू पिणे वगैरे तत्सम गोष्टी करायच्या असतात का. हे वरवरचे बदल म्हणजेच स्त्री सक्षमीकरण असतं का?
वरातितली मुलगी वयाने लहानच दिसत होती, 20 च्या आतबाहेर, शिक्षण तरी पूर्ण झाले असेल की नाही शंकाच वाटत होती, इतक्या लहान वयात लग्न लावून मुलासारखी हौस म्हणून घोड्यावर मिरवत होते. अरे लोकांनो मुलीला मुलासारखी अजिबात वाढवू नका, ती स्त्री आहे त्यामुळे स्त्रीसुलभ सगळ्या भावभावनासहित तिला जगू द्या.
स्त्रीला सक्षम करायची असेल तर तिला शिकवा, स्वतःच्या पायावर उभी करा, तिचे निर्णय घेण्याची तिला मुभा द्या, निर्णय चुकलाच तर चुकीची फळं भोगायची कणखरता तिला शिकवा. कपडे , राहणीमान ह्या वरवरच्या गोष्टींना मी तरी महत्व देत नाही, अर्थात याबाबत स्त्रीच्या इच्छेलाच प्राधान्य असेल

No comments:
Post a Comment