नैतिकतेच्या कोण मारतो गप्पा इथे
चिरून गळे ठरतो कोणी साव इथे
कुणी न शहाणा ठोशास ठोसा मिळतो इथे
कत्तली करून साधूचा असतो आव इथे
धारदार झाल्या गुलकंदि पाकळ्या
रसदार ओठांनाही फुटते संगीण इथे
पेटतो गुलमोहोर उठतो रक्ताळूनी
शांत डोहासही लागते आग इथे
असूनी शांत संन्यस्त संयमी
अंतरात सुनामीचा कल्लोळ इथे
चिरून गळे ठरतो कोणी साव इथे
कुणी न शहाणा ठोशास ठोसा मिळतो इथे
कत्तली करून साधूचा असतो आव इथे
धारदार झाल्या गुलकंदि पाकळ्या
रसदार ओठांनाही फुटते संगीण इथे
पेटतो गुलमोहोर उठतो रक्ताळूनी
शांत डोहासही लागते आग इथे
असूनी शांत संन्यस्त संयमी
अंतरात सुनामीचा कल्लोळ इथे
No comments:
Post a Comment