सौन्दर्य आणि गोरा रंग यांचा परस्पर संबंध लावला जातो. त्यावर सावळ्या आणि काळ्या रंगाचा सौन्दर्याचीसुद्धा चर्चा होते. बाह्यरुप महत्वाचं नाही मन बघा, स्वभाव बघा तसेच गोरा रंग दो दिनमें ढल जायेगा वगैरे गप्पा आपण ऐकत असतो. बाह्यरूपाला महत्व न देता मन, स्वभाव बघणारी नक्की किती लोकं आहेत हे आजूबाजूला बघितलं तरी सहज कळतं. मुलींच्या ग्रुप मध्ये सुंदर आणि उठून दिसणाऱ्या मुलींच्या मागेच मुलांचे घोळके लाळ गाळत असतात. 15,20 वर्षानंतरही भेटलेल्या वर्गमित्रांमध्ये चर्चा होते ती वर्गातल्या एकतर देखण्या मुलीची नाहीतर चालू मुलीची. खालमानेने अभ्यास करणाऱ्या टॅलेंटेड काळ्यासावळ्या मुलींची चर्चा क्वचितच होत असेल.
बाह्यरुपाचं आकर्षण सगळ्यांनाच असतं म्हणून तर कपडे घेताना आपल्या अंगावर छान दिसतील असेच कपडे आपण निवडतो. फार लांब कशाला टीव्ही, फ्रीज घेतानाही त्यातल्या स्पेसिफिकेशनसह मॉडेल कसं दिसतं हेही आपण बघतच असतो. गोऱ्या रंगाला महत्व आहेच वधू पाहिजे वर पाहिजे जाहिरातीत गोरी मुलगी पाहिजे हे लिहिलं जातं, हटकून मुद्दाम कुणी सावळी किंवा काळी मुलगी हवी अशी लिहिलेली जाहिरात माझ्या बघण्यात नाही. गोरं अपत्य होण्यासाठी गरोदरपणात गावठी उपाय जसं दूधकेशर प्याल जातं हे गोऱ्या रंगाचा आकर्षणाचा आहे म्हणूनच न.
मी स्वतः वर्णद्वेषी नाही, मुद्दाम गोरं अपत्य व्हावं म्हणून लोकांचा आटापिटा का होतो त्यामागे मानसिकता काय व कशी असते ह्याचा अंदाज सगळ्यांनाच असतो. गोरा म्हणजे मनाने काळा आणि काळा म्हणजे स्वभाव चांगलाच असेल असे सरसकट म्हणता येत नाही. रूपाने चांगली असणारी लोकं स्वभावाने सुद्धा चांगली असू शकतात त्याच्या उलट प्रकार सुद्धा असतातच.
गोरा रंग म्हणजे पांढरी पाल, पांढरं फटफटीत दिसतं त्यापेक्षा सावळा रंगच छान असं म्हणणं म्हणजे आत्मवंचना असते, गोऱ्या रंगाचं आकर्षण नसतं तर लोकांनी फोटो एडिट करून टाकलेच नसते. सावळा रंगही चेहरा सुंदर असेल तरच उठून दिसतो, गोऱ्याचं तसं नसतं नाकीडोळीचे फ़ॉल्ट्स गोरा रंग झाकून टाकतो म्हणून तर गोरी हजार गुण चोरी ही म्हण तयार झाली आहे.
रंगरूपाचा गर्व किंवा न्यूनगंड बाळगू नये कारण त्यात आपलं स्वतःचे काहीच कर्तृत्व किंवा दोष नसतो हे मात्र जाणीवपूर्वक अधोरेखित करू इच्छिते. रंग कसाही असला तरी अपटूडेट राहून आपल्या रुपाला खुलणारी वस्त्रे आणि मेकअप करून आपण स्वतःच व्यक्तिमत्व चांगल्या रीतीने प्रेझेंट करू शकतो, हे आपल्या हातात आहे
टीप - पोस्टलेखिका स्वतः रंगाने डार्क म्हणजे काळी आहे 😂😂😂😂😂

No comments:
Post a Comment