Wednesday, 28 December 2016

ती

तिला जाग आली, सगळं अंग जड झाल होत, अजिबात उठायची इच्छा नव्हती , पण पोरांच्यासाठि उठाव तर लागणारच होत. पडल्या पडल्या खिडकीचा पडदा सरकवून तिने बाहेर पाहिलं , कालच्या सारखच आभाळ भरून आल होत , पावसाची रिपरिप सुरू होती. काल तीनं बाहेर जायचे टाळले होते, पण आज कस करावे , असा विचार करतच ती उठली . नित्यकर्म उरकून तीन दोन्ही मुलांना उठवले आणि त्यांना त्यांचं आवरायला पाठवल. धाकटा 4 वर्षांचा, थोडा अवखळ पण ऐकायचा, मोठी मुलगी 6 वर्षांची वयाच्या मानान लवकर समज आली होती , परिथिति माणसाला सगळं शिकवते हेच खर.

तिचा नवरा 2 वर्षामागच देवाघरी गेला होता. तेव्हापासून तीच्यावर सगळी जबाबदारी आली होती. म्हणायला नातेवाईक खूप होते पण वेळेला आपल आपल्यालाच बघाव लागत हे तिला चांगलच माहीत झाल होत. कलकत्त्याच्या जवळच्या तालुक्यात तीच गाव , तालुक्याच्या ठिकाणी बचतगटाची बाईजि होती , तिच्या कडून कशिदा करायची कामं मिळायची , 8 दिवसातून तालुक्याच्या गावाला जायचं, आधी केलेले कामं देवून नवीन कामं आणायची असा तिचा नेम होता. कालच खर तर जायला हव होत , पण पावसामुळे गेली न्हवती , आज नाही गेल तर उद्या खायच काय हा प्रश्न होता. जवळचे सगळे पैसे संपून गेले होते , घरातले धान्य रेशन सगळं संपलं होत.

घरातले डबे डुबे उघडून तिने काय काय शिल्लक आहे ते बघितल ,फार काहीच नव्हते थोडीशी डाळ, तांदूळ होती फक्त , त्याची खिचडी बनवली ,पोरांना खाऊ घातले उरलेले थोडे तिने खाल्ले वर तांब्याभर पाणी प्याली , पोरांच्या गालावर प्रेमाने हात फिरवले आणि "मी तालुक्याच्या गावाला जाऊन येते , संध्याकाळ होईल, घरातच खेळा, बाहेर जाऊ नका, तू लक्षं दे ग याच्याकडे " दोघांना समजाऊनं ती निघाली. कशीदाकामाच गाठोड भिजू नये म्हनून प्लॅस्टिक च्या पोत्यात भरल आणि ती निघाली .

घरच्या बाहेर पडल्यावर अनवाणी पायांनी चिखल तुडवत ती चालली,बस टमटम काही दिसतय का बघत होती, बस थांब्यावर कोणीच न्हवत ,पावसामुळे बाहेर पडलं नसावं कुणी. लांबूनच एक बस येताना दिसली पळत पळत जाऊन तिने हात दाखवला, गाठोड सांभाळून कशी बशी ती बस मध्ये चढली तिकीट काढलं आणि सकाळ पासूनच्या सगळ्या थकव्यामुळे तिचा डोळा लागला .

जोरदार हदरा जाणवून ती जागी झाली , डोळे चोळत इकडे बघितले तर तालुक्याच गाव आल होते. बोचक सांभाळून ती खाली उतरली , पाय ओढत बचतगटाच्या ऑफिस कड निघाली,हळू हळू चालत तिथपर्यंत पोचला अर्धा तास लागला. तिथ पोचली तर ऑफिसला कुलूप , ऑफिसच्या मागच्या शिपायच्या घरी जाऊन चौकशी करावी अस वाटून ती तिकडं गेली .केविलवाण्या चेहर्‍याने तिने तिथे उभ्या असलेल्या बाईला विचारलं बाईजि कुठे गेल्यात हो , 'आताच बाहेर गेल्यात , घंटभरात येतील, बसा ' त्या बाईला दया येवून तिणी हिला चहा पाणी दिले , परत ऑफिस च्या पडवीत बसून राहिली. सगळा जीव पोरकडे अडकलेला .

पावसाची रिपरिप सुरूच होती , पोर काय करत असतील , जाताना रेशन घेऊन जायचे , अनेक विचार मनात सुरू होते , तेवढ्यात बाईजि येताना दिसल्या तिचा जिव भांड्यात पडला , बाईजि आल्या 'काय ग कशी आहेस, मुले काशी आहेत' त्यांनी विचारले 'सगळे नीट हाय बघा' तीच उत्तर. 'चल हिशेब करून टाकू तुझा' बाईजिणी केलेलं काम नीट बघून घेतले. ' आता पुढचं काम देवू का , कशी ग नेशील तू' बाईजि नि विचारले 'बाईजि येवस्थित न्हेते बघा, भिजून नाही देत ' असे म्हणून बाईजि ने दिलेल्या कापडचे गठ्ठे तिने प्लॅस्टिक च्या पोत्यात भरले,पोते उचलून बाईजिला नमस्कार करून 'येते पुडल्या हप्त्यात ' सांगून ती निघाली.

बसथांब्या च्या वाटेतच किरण्याच्या दुकानातून तिन लागणार्‍या सगळ्या वस्तु घेतल्या, पोरांसाठी शेव कुरमुरे बांधून घेतले, सगळे पोत्यात भरून ती ,बसस्टॉप च्या दिशेनं गेली. बस लागलीच होती, तिचा जीव भांड्यात पडला , आता काळजी नाही, वेळेवर घरी पोचू, ती निश्चिंत झाली. एकतासभर बस हळू हळू जात होती, पावसा मुले बस चा वेग खूपच कमी होता. थोड्यावेळाने बस गप्पकण थांबली, 'गाडी पुढं जाणार नाही, पूल पाण्याखाली गेलाय' ड्रायवर ने माग वळून सगळ्यांना संगितले. एकेक प्रवासी खाली उतरु लागले , 'काय करायचे व आता ' तिन बाकीच्यानं विचारले , 'थांबू गाडीतच 5-6 तासात पाणी ओसरल की जाऊ' बापरे 5-6 तास म्हणजे रात्र किती होईल, पोरे काय करतील या विचारांनीच ती हैराण झाली , डोक बधिर झाले , थोडा वेळ तशीच बसून राहिली.

मुलांचे चहरे डोळ्यापुढे उभे राहिले, भुकेले असतील, मी जर गेले नाही तर उपाशी राहतील, मला शोधयला बाहेर पडले तर , एक न अनेक विचार मनात येत होते. खिडकीतून बाहेर नजर टाकली , दूरवर नदीकाठी एक नाव दिसली , नावाडी नव्हता, थोडा वेळ विचार केला , मनाशी निर्धार करूनच ती उठली, नदीच्या दिशेने चालू लागली, सहप्रवासी बघतच राहिले , 'ये बाई कुठे चालली' सगळ्यांकडे दुर्लक्ष करून ती नदी काठी आली, लोखंडी खांबाला बांधलेली नाव सोडली आणि पोत आत टाकून त्यात चढली. होडी पाण्यावर हेलकावत होती, तोल सावरत बसली . आतल वल्ह उचलल आणि जिवाच्या आकांतान तिने वल्ह मारायला सुरुवात केली.

आता ती लवकरच तिच्या लेकराणा भेटणार होती, त्या परिस्तिथितही तिच्या चेहर्‍यावर हसू फुलले.

No comments:

Post a Comment